
चंद्रमुनी बन्सोड गोंदिया
सडक अर्जुनी : जिल्हा परिषद शाळा कोयलारी येथे दिनांक १२/९/२०२५ रोज शनिवारला शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी तानापोड्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविला.
*विशेष म्हणजे ग्रामविकास अधिकारी सी. डब्ल्यू. कापगते यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना पाण्याची बॉटल देण्यात आले. व शाळा समितीकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रामीण संस्कृती, परंपरा तसेच तानापोड्याचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती सोमेश्वर मेश्राम मुख्याध्यापक, राऊत सर, धर्मेंद्र सोनवणे शाळा समिती अध्यक्ष, रजनीकांत वालदे सरपंच,विनोद वालदे, देवानंद गहाणे,धनलाल परशुरामकर, हेमू वालदे, ताराचंद शेंद्रे,दिलीप उईके, संजय वालदे, रामलाल शहारे, नीताराम तरोने, रमा जनबंधू, शितल पर्वते, प्रणाली मौदेकर, सुप्रिया वालदे, अजित राऊत, यादवराव ब्राह्मणकर, गोल्डी राऊत, प्रवीण थेर, व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी विशेष सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम उत्साहात पार पडला.






