ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, ग्रामस्थांमध्ये नाराजी
सडक अर्जुनी, दि. ११ ऑक्टोबर :
सणासुदीचे दिवस सुरू असताना गावातील रस्ते प्रकाशाने उजळून निघेणे अपेक्षित असताना शेंडा येथे मात्र गेल्या तीन दिवसांपासून पथदिवे बंद असल्याने गावावर अंधाराचे सावट पसरले आहे. एकीकडे नागरिक सणासमारंभाच्या तयारीत व्यस्त असताना दुसरीकडे मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलें जात आहे. पथदिवे बंद असूनही दुरुस्तीसाठी ठोस हालचाल दिसत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे काय? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर
गावातील सार्बजनिक रस्ते, चौक आणि वर्दळीच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश असणे ही केबळ सोयींची बाब नसून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही महत्वाची गरज आहे. मात्र, शेंडा येथे सलग तीन दिवस पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधारातून मार्ग काढावा लागत आहे. सणासुदीच्या काळात रात्री उशिरापर्यत नागरिकांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत पथदिवे बंद राहणे गैरसोयीचे ठरत असून अपघात आणि अनुचित प्रकारांची भीतीही व्यक केली जात आहे.
तक्रारींची दखल कधी घेणार?
गावातील पथदिव्यांची देखभाल व दुरूस्ती करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाची आहे. एखाद्या तांत्रिक कारणामुळे रणामुळे दिवे बंद पडले असतील, तर त्यांची तातडीने दुरूस्ती करणे अपेक्षित आहे. मात्र, तीन दिवस उलटूनही प्रकाशव्यवस्था पूर्ववत झाली नसल्याने प्रशासनाच्या तत्परतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. गावातील मूलभूत सुविधांकडे वेळेत लक्ष दिले जात नसेल, तर ग्रामस्थांनी अपेक्षा तरी कोणाकडून ठेवायच्या, असा सवालही उपस्थित होत आहे.
सणासुदीत तरी प्रशासनाला जाग येणार का?
सणासमारंभाच्या काळात गावातील स्वच्छता, पाणीपुरवठा आणि पथदिव्यांसारख्या मूलभूत सुविधांची विशेप काळजी घेणे आवश्यक असते. अशा वेळीच पथदिवे बंद राहणे ही बाब ग्रामस्थांच्या नाराजीचे कारण ठरत आहे. संबंधित अधिकान्यांनी परिस्थितीची तातडीने दखल घेऊन बंद पडलेले पथदिवे सुरू करावेत आणि भविष्यात अशा समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी नियमित देखभाल व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. आता ग्रामपंचायत प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन गावातील अंधार दूर करणार की ग्रामस्थांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार, याकडे शेंडा ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


