अतिवृष्टीने दुरवस्था अधिक गंभीर; विद्यार्थी, शेतकरी व वाहनचालकांचा जीवघेणा प्रवास तातडीने डागडुजीची मागणी

चंद्रमुनी बन्सोड गोंदिया
सडक अर्जुनी तालुक्यातील
शेंडा-सालईटोला-डव्वा मार्गाची अक्षरशः चाळण झाली असून, रस्ता खड्ड्यांत हरवला आहे. जागोजागी पडलेले मोठमोठे खड्डे, उखडलेली गिट्टी आणि चिखलामुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. शालेय विद्यार्थी, दुचाकीस्वार, सायकलस्वार, शेतकरी, बैलगाडी चालक तसेच चारचाकी वाहनधारकांना दररोज जीव मुठीत प्रवास करावा लागत आहे.
काही वर्षापूर्वी या मार्गाची डागडुजी करण्यात आली होती. मात्र, अल्पावधीतच रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाल्याने डागडुजीच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका रस्त्याला बसला असून, ठिकठिकाणी डांबर उखडून गिट्टी रस्त्यावर पसरली आहे. अनेक खड्ड्रांमध्ये मुरूम व चिखल साचल्याने वाहनांचे नियंत्रण सुटण्याचा धोका वाढला आहे.
म्हणज शेंडा, सालईटोला आणि चिरचाळी परिसरात पेट्रोलपंप नसल्याने नागरिकांना पेट्रोल-डिझेलसाठी डव्वा रोडकडे नियमित ये-जा करावी लागते. त्यामुळे या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, रस्त्याची दुरवस्था नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी डोकेदुखी ठरली आहे.
विशेषतः शाळेत जाणान्या विद्यार्थ्यांना आणि दुचाकीस्वारांना खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाच्या पाण्याने खड्ड्यांची खोली लक्षात येत नसल्याने अपघाताचा धोका आणखी वाढतो. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर लहान-मोठ्या अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.
66 “शेंडा-सालईटोला-डव्वा संपूर्ण रस्ता
दोन-तीन वर्षापासून खड्ड्यांनी व्यापला आहे. शालेय विद्यार्थी, दुचाकीस्वार, बैलगाडी,
सायकलस्वार तसेच चारचाकी वाहनचालकांच्या डोक्याचा ताण वाढविणारे हे खड्डे ठरत आहेत.
या मार्गावर लहान-मोठ्या अपघातांतही वाढ झाली आहे.
कमल कुमार चव्हाण,
सेवानिवृत्त शिक्षक तथा आदर्श शेतकरी, शेंडा
रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असताना संबंधित विभागांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त. होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून दर्जदार डागडुजी करावी, तसेच धोकादायक खड्डे तातडीने बुजवावेत, अशी जोरदार मागणी शेंडा, सालईटोला व परिसरातील नागरिकांनी केली आहे.





