
सडक अर्जुनी : तालुक्यातील शेंडा येथील
पंचशील बौद्धविहाराला जीवन ज्योती ग्राम संघाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष ललिता चंद्रमणी बनसोड यांच्याकडून सप्रेम भेट म्हणून मेटी दान करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत बौद्ध धम्माच्या विचारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी पंचशील बौद्धविहारात आयोजित कार्यक्रमाला बौद्ध स्मारक समितींचे अध्यक्ष लालचंद गजभिये, वर्षा तागडे, रचना बोरकर, शीला रामटेके, सरू मेश्राम, प्रेमलता तिरपुडे, लता कोटांगले, माधुरी गेडाम, अजंता मेश्राम तसेच बौद्ध महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.
ललिता चंद्रमणी बनसोड यांनी बौद्धविहाराला भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला. तसेच बौद्धविहाराच्या धार्मिक व सामाजिक उपक्रमांना भविष्यातही सहकार्य करण्यांची भावना त्यांनी व्यक्त केली.
पंचशील बौद्धविहारात मेटी दान करताना जीवन ज्योती ग्राम संघाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष ललिता चंद्रमणी बनसोड व बौद्ध स्मारक समितीचे पदाधिकारी व महिला मंडळाच्या सदस्य.
बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासोबतच सामाजिक कार्यात महिलांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्यांचे यावेळी सांगण्यात आले. पंचशील बौद्धविहारास देण्यात आलेल्या सप्रेम भेटीबद्दल बौद्ध स्मारक समितीच्या वतीने ललिता चंद्रमणी बनसोड यांचे आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित महिला मंडळाच्या सदस्यांनी सामाजिक एकजूट, महिला सक्षमीकरण आणि बौद्ध धम्माच्या विचारांचा प्रसार याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.





