चंद्रमुनी बन्सोड गोंदिया
शौर्य, स्वाभिमान आणि समाजकार्याला अभिवादन; युवकांनी शिक्षण व सामाजिक विकासात सहभागी होण्याचे आवाहन
सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथे वीरांगना महाराणी दुर्गावती मडावी यांच्या 502 वी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी महाराणी दुर्गावती यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवर व समाजबांधवांनी त्यांना अभिवादन केले.
कार्यक्रमादरम्यान महाराणी दुर्गावती यांच्या शौर्य, पराक्रम, स्वाभिमान तसेच समाजासाठी केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. त्यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा आदर्श घेऊन समाजातील युवकांनी शिक्षण, सामाजिक एकोपा आणि समाजाच्या विकासासाठी सक्रिचपणे सहभागी व्हावे, असे आवाहन मान्यवरांनी केले.
यावेळी डॉ, सुरेशकुमार पंधरे, अशोक लांजेवार (माजी नायब तहसीलदार, सडक अर्जुनी), आनंद मडावी (माजी प्रकल्प अधिकारी), डॉ. संजय गौतमवार (शासकीय आश्रमशाळा, शेगां), प्रशांत बोरकर (अॅडव्होकेट, हायकोर्ट नागपूर), पवन टेकाम, हेमराज बाढवे, झाडू शिरसाम, अध्यक्ष ज्योतीताई टेकाम, झुरणाबाई, मुक्ताबाई पंधरे-मडावी, किशन शिरसाम, जयवंता पुराम, रजनीताई वाढवे, अनिल पंधरे, शोलाताई पंधरे, पूजा टेकाम, भोजराज टेकाम, मंगेश उईके यांच्यासह गावातील नागरिक, महिला, युवक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध मान्यवरांनी महाराणी दुर्गावती यांच्या ऐतिहासिक कार्याला उजाळा देत त्यांच्या शौर्याला व समाजासाठीच्या योगदानाला आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमामुळे शेंडा परिसरात उत्साहांचे वातावरण निर्माण झाले होते.








